आमीर खानचा सोशल मीडियाला बाय बाय!

आमीर खानचा सोशल मीडियाला  बाय बाय!

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमीर खानने त्याच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानंतर अचानक सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूडच्या ह्या  सुपरस्टारने आपल्या शेवटच्या इंस्टा पोस्टमध्ये असे म्हटले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे. माझे मन तुमच्या प्रेमाने भरले आहे.’ त्याने या अचानक केलेल्या घोषणांमुळे त्याचे चाहते देखील अवाक झाले आहेत. आमीरने केलेल्या गुडबाय पोस्टवर ते सतत कमेंट करत आहे, इतकेच नाही तर त्यांनी असा अचानक हा निर्णय का घेतला?, हा प्रश्न देखील विचारताना दिसून येत आहे.  २०१८ मध्ये, आमीरने आपल्या वाढदिवशी आपल्या आईचे छायाचित्र शेअर करून इंस्टाग्रामवर डेब्यू केला होता, मात्र त्यानंतर अवघ्या तीन वर्षामध्ये तो सोशल मीडियावरून एक्झिट मारत असल्यामुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत. 

आमीरने आपल्या या गुडबाय पोस्टमध्ये म्हंटले आहे की, '‘मित्रांनो, माझ्या वाढदिवसाच्या माझ्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद! माझे हृदय भरून आले आहे. दुसरी बातमी अशी आहे की सोशल मीडियावरील ही माझी शेवटची पोस्ट असेल. या माध्यमावर मी फारसे सक्रिय नसलो, तरी मी त्यांच्यापासून दूर राहण्याचे निश्चित केले आहे. आपण पूर्वीप्रमाणेच बोलू. एकेपीला (आमिर खान प्रॉडक्शन) त्याचे अधिकृत चॅनेल बनवले आहे, तर भविष्यात तुम्हाला त्याच्या चित्रपटांच्या अपडेट्स त्याच्या हँडल @akppl_official वर मिळेल. भरपूर प्रेम.’

 

अलीकडेच त्याने ‘लालसिंग चड्ढा’ रिलीज होईपर्यंत आपला फोन ‘लॉक’ ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सेटवर त्याचा मोबाईल सतत वाजल्यामुळे त्याच्या कामावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी त्याने फोन बंद करण्याचा निर्णय घेतला.