मिस इंडिया 2020 मानसा वाराणसी स्वतःला मानते 'वुमन ऑन मिशन', जाणून घेऊ तिच्याबद्दल

फाइनेंशियल एक्सचेंज इन्फॉर्मेशन एनालिस्ट आहे मानसा वाराणसी

मिस इंडिया 2020 मानसा वाराणसी स्वतःला मानते  'वुमन ऑन मिशन', जाणून घेऊ तिच्याबद्दल
all photos from @missindiaorg

 

मानसा वाराणसीने व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया 2020 चा किताब आपल्या नावे केला आहे. तिच्या व्यतिरिक्त मान्या सिंग आणि मनिका शियोकंद या प्रथम आणि द्वितीय उपविजेत्या ठरल्या.

 

मानसा ही मूळची तेलंगणाची असून, ती व्यवसायाने  फाइनेंशियल एक्सचेंज इन्फॉर्मेशन एनालिस्ट आहे.

 

 

गेल्या वर्षी फक्त मिस इंडिया होण्याचे स्वप्न मानसाने पाहिले होते आणि त्यासाठीच्या प्रक्रियेत ती सामील झाली.

 

 

मानसा स्वत: ला 'वूमन ऑन मिशन' म्हणते.

 

 

मानसाला हैदराबादी बिर्याणी खूप आवडते. 

 

 

मानसाने कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे. 

 

 

मुलांशी संबंधित सामाजिक प्रकल्पांशी ती जुळली आहे आणि त्यांच्यासाठी काम करते. देशातील सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार असून त्यासाठी ती प्रयत्नशील आहे.

 

 

 

तिने ८ वर्ष भरतनाट्यम चे शिक्षण घेतले आहे, शिवाय ४ वर्ष शास्त्रीय संगीताचा अभ्यासदेखील केला आहे. 

 

 

 

मानसा स्वतःला स्पोर्ट पर्सन मानत नसली तरी तिला स्विमिंग तसेच बेडमिंटन आणि टेबल टेनिस खेळायला आवडते.