आता नाट्यगृह उघडणार, तिसरी घंटा पुन्हा वाजणार..

आता नाट्यगृह उघडणार, तिसरी घंटा पुन्हा वाजणार..


आज दिनांक ०३ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री श्री. उद्धवजी साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नाट्यगृह सुरू करण्यासाठी भेट घेतली. या चर्चेसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नवनाथ मच्छिन्द्र कांबळी,  मंगेश कदम, मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघ अध्यक्ष: संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटना अध्यक्ष: किशोर वेल्ले, विजय केंकरे, रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी विजय राणे, आणि ही भेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेणारे श्री. आदेश बांदेकर , श्री. सुबोध भावे या सगळ्यांच्या उपस्थितीत आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो असा की नाट्यगृह ५०% प्रेक्षक उपस्थितीमध्ये ५ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू करण्याचे आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना ताबडतोब देण्यात आले.

यावेळी रंगकर्मीं आंदोलन महाराष्ट्राचे प्रतिनिधी श्री.विजय राणे यांनी रंगकर्मीं आंदोलन महाराष्ट्रच्या निवेदनातील मागण्यां संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली महाराष्ट्रातील लोककलाकारांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी करोना नियमांचे पालन करण्यासंबंधी सुधारीत नियमावली बनवून परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.सरकार दरबारी रंगकर्मींची नोंद करण्यासंदर्भातील माहिती देण्यासाठी सोमवारी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकांनी रंगकर्मीं प्रतिनिधीना  कार्यालयात बोलावले आहे.

फि न भरल्यामुळे रंगकर्मीच्या मुलांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांची यादी लवकरात लवकर देण्यात यावी असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले यावेळी कलाकार पेन्शन योजनेतील उत्पन्नाच्या दाखल्याची अट मर्यादा वाढविण्या विषयी तसेच रंगकर्मीं रोजगार हमी योजने बद्दल ही चर्चा झाली. विजय राणे यांनी रंगकर्मींच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.