राधिका आपटे वर भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप

राधिका आपटे वर भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप

राधिका आपटेच्या उत्कृष्ट अभिनयाचं नेहमीचं कौतुक केले जाते. मराठमोळ्या राधिकाने बॉलिवूड आणि साउथमध्ये आपली एक विशेष जागा निर्माण केली आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर राधिकाला बॉयकॉट करण्याचा ट्रेंड व्हायरल होतं आहे. ट्वीटरवर सध्या #BoyCottRadhikaApte हा ट्रेंड व्हायरल होतं आहे.

राधिका आपटेने २०१६ मध्ये लीना यादव दिग्दर्शित ‘पार्च्ड’ या चित्रपटात काम केलं होतं. यामध्ये राधिका अभिनेता आदिल हुसैनसोबत झळकली होती. या चित्रपटात राधिकाने आदिलसोबत न्यूड सीन दिलं होतं. यावरूनचं तिला पुन्हा एकदा ट्रोल केलं जातं आहे.

मध्यंतरी ह्या सिनेमातील एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर लिक झाला होता. त्यामुळे राधिका आपटे मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती. त्यांनतर आज पुन्हा एकदा या सीनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राधिकाला बॉयकॉट करण्याचा ट्रेंड ट्वीटरवर सुरु झाला आहे. बॉलिवूड चित्रपटांमुळे आपल्या देशामध्ये अश्लीलता पसरत आहे, म्हणत ट्रोलर्सनी राधिकाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच राधिकाने भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. या सीनमुळे नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले आहेत.