तेजस बर्वेची 'वैदही' मध्ये प्रमुख भूमिका

तेजस बर्वेची 'वैदही' मध्ये प्रमुख भूमिका

‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला चार्म ना यक तेजस बर्वेच्या सोशल मीडियावरील फॅन पेजची संख्या मोठी आहे. या मालिकेती सुमी आणि समरची जोडी घराघरात पोहोचली. अवघ्या काही काळातच ही मालिका हिट ठरली होती. या मालिकेत भावी मुख्यमंत्री बनून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा अभिनेता तेजस बर्वे आता एका नव्या मालिकेत दिसणार आहे. सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या ‘वैदही’ या मालिकेत तो  आहे. 

या मालिकेमध्ये सायली देवधर, पल्लवी पाटील, तृष्णा चंद्राते यांच्यासह इतरांच्या भूमिका असणार आहेत. या मालिकेच्या शूटिंगला सुरूवात देखील झाली असून त्याच्या या नव्या मालिकेचा प्रोमो सुद्धा रिलीज झालाय. मात्र या प्रोमोमध्ये फक्त नायिका सायली देवधर दिसून येतेय. या मालिकेतील मुख्य नायकाचा चेहरा गुलदस्त्यात ठेवण्यात आलाय. त्यामूळे यात मुख्य नायक कोण असणार याची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. हा मुख्य नायक दुसरा तिसरा कोणी नाही तर ‘मिसेस मुख्यमंत्री’ मधला अभिनेता तेजस बर्वे आहे. या मालिकेत तेजस बर्वे ‘पराग’ या नावाची भूमिका साकारणार आहे. येत्या १६ ऑगस्टपासून ही मालिका सुरू होणार आहे. 

अभिनेता तेजस बर्वे यापूर्वी अनेक छोट्या- मोठ्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तेजसने क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मैत्रीवर आधारित ‘चॅलेंज’ या ऐतिहासिक नाटकामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. त्याने फत्तेशिकस्त यांच्याबरोबर साहाय्यक दिग्दर्शकाचे काम देखील केले आहे. ‘जिंदगी नॉट आउट’ या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात डेब्यू केलं. या मालिकेत त्याने सचिन देसाईची भूमिका साकारली होती. 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातही तो झळकला होता.