'सिटी ऑफ ड्रीम्स' सीजन २ चे शूटिंग पूर्ण

पहिला सीजन सुपरहिट, प्रिया बाबट ठरली होती चर्चेचा विषय !

'सिटी ऑफ ड्रीम्स' सीजन २ चे शूटिंग पूर्ण
Priya with Director Nagesh Kukunoor
'सिटी ऑफ ड्रीम्स' सीजन २ चे शूटिंग पूर्ण

प्रिया बापटने नुकतच 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या दुसऱ्या सिझनचं शुटिंग पूर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. प्रियाने  व्रेपअप सेलिब्रेशनचा व्हिडियो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.  

'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरीजच्या पहिल्या सीजनची मोठी चर्चा झाली होती. या सिरीजमध्ये असलेल्या दमदार मराठमोळ्या स्टारकास्टने तर सगळ्यांंचचं लक्ष वेधलं होतं. तसेच, या सिरींजमधील प्रिया बापटचा समलैंगिक किसींग सीन  मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला होता. ज्यामुळे प्रिया ट्रॉल देखील झाली, मात्र, या सीनला ट्रोल करणाऱ्यांना प्रियाने सडेतोड उत्तर दिलं होतं. तसेच, प्रियाच्या कामाचंदेखील भरपूर कौतुक करण्यात आलं. 

३७६ दिवसांत या सिरीजचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. लवकरच ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजच्या पहिल्या सिझनचं दिग्दर्शन, लेखन करणारे नागेश कुकुनूर यांनीच दुसऱ्या सिझनचही दिग्दर्शन केलं आहे. राजकारण आणि नाती याभोवती फिरणारी या सिरीजच्या कहाणी आता दुसऱ्या सिझनमध्ये काय वळण घेऊन येतेय हे पाहणं रोमांचक ठरणार आहे.