आयुष्यभराच्या संघर्षावर मार्मिक भाष्य करणारा ‘पेन्शन’, ट्रेलर प्रदर्शित

सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत

आयुष्यभराच्या संघर्षावर मार्मिक भाष्य करणारा ‘पेन्शन’, ट्रेलर प्रदर्शित

आयुष्य जगत असताना संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाही. त्यातच जर घरची परिस्थिती बिकट असेल तर अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कमी पैशांमध्ये घर चालवणं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील वयस्क व्यक्तींच्या आजारपणाचा खर्च हे सारं काही करताना घरच्या मूळ कमवत्या व्यक्तीची मात्र दमछाक होते. या सगळ्या परिस्थितीचं चित्रण ‘पेन्शन’ या चित्रपटात उलगडण्यात आलं आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो अनेकांचं लक्ष वेधत आहे.

 

">

 

जीवनात संघर्ष प्रत्येकाच्याच वाट्याला येतो. पण या संघर्षालाही अनेक पैलू असतात. असेच संघर्षाचे अनेक पैलू समोर आणणारा सिनेमा म्हणजे पेन्शन. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पेन्शनमध्ये मुख्य भूमिकेत दिसते आहे. याशिवाय सुमीत गुट्टे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे.

घरातील उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत पेन्शन असतो.अशावेळी तो त्याच्या मुळालाच धक्का लागायला सुरुवात झाली तर काय घडतं हे या सिनेमात दिसेल. या सिनेमाची निर्मिती इरॉस नाऊ करत असून सिनेमाचं दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ करत आहेत. हा सिनेमा येत्या २४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.