दृष्टीहीन नजरेतला आशयधन 'दृष्टांत' मोठ्या पडद्यावर

दृष्टीहीन नजरेतला आशयधन  'दृष्टांत' मोठ्या पडद्यावर

मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सातत्याने आशयधन चित्रपटांची मोहोर उमटवली आहे. आगामी 'दृष्टांत' हा अर्थपूर्ण चित्रपटदेखील प्रेक्षकांना आपलेसे करेल यात शंका नाही. 

‘दृष्टांत’ सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम वेगात सुरु आहे. चित्रपटातील कलाकार हे वास्तविक जीवनात सुद्धा दृष्टिहीन असून त्यांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. इतकेच नव्हे तर, या चित्रपटाचे पडद्यामागील युनिट, गायक, संगीतकार आणि डबिंग कलाकार देखील दृष्टिहीन आहेत. त्यामुळे अश्या वेगळ्या पठडीतल्या सिनेमाचे सादरीकरण होणे म्हणजे भारतीय सिनेमाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.अभिजित के झांजल दिग्दर्शित 'दृष्टांत' हा चित्रपट दृष्टिहीन कलाकार आणि लोकांसाठी प्रेरणादायी आहे, 

ह्या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण गोव्यात झाले असून, आयुष्याचे महत्व आणि जगण्याचा मूलमंत्र सांगून जाणारा हा चित्रपट सामाजिक संदेश देणारा आहे. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट दृष्टिहीन आणि कर्णबधीर लोकांना पाहता आणि ऐकता येईल याची विशेष काळजी घेऊन बनवला आहे. चित्रपट बनवण्या मागचा मुख्य उद्देश आहे की सर्वसामान्य लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे आणि तसेच अवयव दान आणि सामाजिक दृष्ट्या कमी भाग्यवान व्यक्तीला मदत करणे हे आहे. 

बीएम प्रॉडक्शन्स आणि पोलराइड मीडिया निर्मित, त्रिपुर सिंग, तन्मय तेलंग आणि हर्षवर्धन हे चित्रपटाचे निर्माते आहेत.सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम वेगात सुरु आहे.